Saturday, 4 May 2013

संध्याकाळ

संध्याकाळ

क्षितिजावर सुर्य मावळतीला, जसा व्याकूळ तिच्या भेटीला
सुंदर तो सुमुद्रकीनारा, रम्य तो देखावा लुभावणारा,
अशात तिचा सहवास , तिचा श्वास, अनुभवला जरा,
प्रेमाचा हा भास, कि आभास, असेल का खरा ...

मला ती संध्याकाळ अशी जादू करून गेली
पुन्हा तुझ्या आठवणीत जाने कुठे निघून गेली
मला तुला विसरणे तसे खूप सोप्पे आहे
पण मी काय करू , मला तुझी सवय पडून गेली

उमेश गिते

मराठी बाणा

मराठी बाणा

कुणी म्हणे, गर्वच नाही तर माज आहे
कुणी म्हणे , नडला तर तोडला
तर कुणी म्हणे , मोडेन पण वाकणार नाही
आणि कुणी म्हणे बरेच काही

फेसबुकवर मराठी बाण्याच्या
खूप पोस्ट पाहतो
अभिमानाने मग मी पण
आपले उर बडवून घेतो

पण आरक्षण च्या मुद्द्यावर
मला एक प्रश्न पडतो ?
आपण सर्व मराठी मग
आपापसात का वाद घालतो ?

सर्वच आपण स्वताला शिवरायांचे
मावळे नेहमीच समजतो ,
मग नेमका अशावेळी
आपला अभिमान कुठे जातो ..

उमेश गिते

शनिवार ,रविवार मी फक्त लोळणार

शनिवार ,रविवार मी फक्त लोळणार

दैनदिन विधी आटपून बेडरूम मध्ये पळणार
आता शनिवार ,रविवार मी फक्त लोळणार

अंथरुणातच बसूनच वर्तमान पत्र चाळणार
बायकोच्या "अहो "ला "ओ "द्यायचे टाळणार

दळण नाही दळणार,कणिक नाही मळणार,
आयत्या ताटावर मिळेल ते गुमान गिळणार

शब्द जोडताना उडते खूप धांदल ,
म्हणे मित्रमंडळ , लिखाण तुमचे बंडल,
सहन करा मित्रांनो, तुम्हाला थोडासा छळणार
असे वाचायला लावून जरा तुम्हास पिळणार

झोपायचे सर्व नियम आज मी पाळणार
आता शनिवार , रविवार मी फक्त लोळणार

उमेश गिते

Thursday, 16 August 2012

एक कॉलेज वीराचे प्रेम

एक कॉलेज वीराचे प्रेम.....गुलाब

सायन्स स्टुडेंट :असा विचार करतात कि गुलाब कसे तयार झाले ?

कॉमर्स स्टुडेंट : असा विचार करतात कि ते गुलाब कसे विकले जाईल ?

आर्ट स्टुडेंट : असा विचार करतात कि ते गुलाब कुणाला देऊ ?

जगातील ३ खूप सुंदर गोष्टी

जगातील ३ खूप सुंदर गोष्टी ,
ज्या अनुभवताना आपले डोळे आपोआप मिटतात ..

१. कीस करताना

२. खळखळून मनापासून हसताना

३. स्वप्ने पाहताना

Monday, 4 June 2012

प्रपोस

तिला प्रपोस केले.....

नकार देताना ती म्हणाली 
" तुझे माझे मिलन होईल म्हणजे एक स्वप्नच असेल "

च्यायला तिचे म्हणणे खरे ठरले राव...

" आता ती रोज स्वप्नात येते..अन साऱ्या अंगाला गुदगुल्या करून जाते "


साईझ झिरो

आजकाल सर्वच मुली " साईझ झिरो " च्या मागे लागल्या आहेत..
जेणेकरून मुले त्यांच्या वर आपला जीव ओवाळून टाकतील..

पण त्यांना हे कुठे माहित असते...
मुले फक्त त्याच मुलीवर प्रेम करतात "जिचे हृदय निर्मळ आणि स्वभाव छान असतो "

" साईझ झिरो " ..हाडांच्या मागे तर कुत्रे लागतात