Thursday 16 August 2012

एक कॉलेज वीराचे प्रेम

एक कॉलेज वीराचे प्रेम.....गुलाब

सायन्स स्टुडेंट :असा विचार करतात कि गुलाब कसे तयार झाले ?

कॉमर्स स्टुडेंट : असा विचार करतात कि ते गुलाब कसे विकले जाईल ?

आर्ट स्टुडेंट : असा विचार करतात कि ते गुलाब कुणाला देऊ ?

जगातील ३ खूप सुंदर गोष्टी

जगातील ३ खूप सुंदर गोष्टी ,
ज्या अनुभवताना आपले डोळे आपोआप मिटतात ..

१. कीस करताना

२. खळखळून मनापासून हसताना

३. स्वप्ने पाहताना

Monday 4 June 2012

प्रपोस

तिला प्रपोस केले.....

नकार देताना ती म्हणाली 
" तुझे माझे मिलन होईल म्हणजे एक स्वप्नच असेल "

च्यायला तिचे म्हणणे खरे ठरले राव...

" आता ती रोज स्वप्नात येते..अन साऱ्या अंगाला गुदगुल्या करून जाते "


साईझ झिरो

आजकाल सर्वच मुली " साईझ झिरो " च्या मागे लागल्या आहेत..
जेणेकरून मुले त्यांच्या वर आपला जीव ओवाळून टाकतील..

पण त्यांना हे कुठे माहित असते...
मुले फक्त त्याच मुलीवर प्रेम करतात "जिचे हृदय निर्मळ आणि स्वभाव छान असतो "

" साईझ झिरो " ..हाडांच्या मागे तर कुत्रे लागतात 


वटपोर्णिमा

काल माहेरी गेलेल्या बायकोला वट पोर्णिमे निम्मित्त फोन केला 

तर तिने माझ्या नावाचा आगोदरच उपवास सोडला होता 

ती म्हणे...

उपवासात केला होता खिचडी अन साबुदाणा वड्याचा मेनू 

पुढच्या वट पोर्णिमे पर्यंत तुम्हालाच केलाय पुन्हा रिन्यू 


Friday 18 May 2012

मला एड्स झालाय............... (भाग १)

मला एड्स.. झालाय... .30/10/2011................................ (भाग १)

सकाळी सकाळी डॉक्टर चे रिपोर्ट कुरियर बॉय ने
दिले..आतील मजकूर वाचून प्रकाश (पक्या) उडालाच..

ब्लड रिपोर्ट होता : H.I.V. Positive..

पक्या तसा कामाला व्यवस्थीत, ६ लाखाचे पॅकेज होते, लग्न जस्ट जमविले
होते, आई वडील, बहीण गावाला, कशाची काहीही कमतरता नाही...

काही दिवस त्याला सतत ताप येत होता,म्हणून डॉक्टर ने ब्लड चेक करायला
सांगितले, सोबत H.I.V ची टेस्ट पण केली गेली...

पक्याने अंदाज बांधायला सुरूवात केली, कसे आणि कधी घडले असावे..पण
त्याला काही आठवेना, आता तिला कसे समजवायाचे, निराश होऊन तसाच
पक्या ऑफीस ची लेदरबॅग घेऊन स्वत: च्या कारने ऑफीस ला जायला निघाला,
अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने त्याच्याकडे लिफ्ट मागितली,
तो खूप दमल्या सारखा वाटल्याने पक्या ने त्याला गाडीत घेतले...पण काही अंतर पार
पडल्यानंतर त्या व्यक्तीला मोबाइल वर फोन आल्याने ती व्यक्ती मधेच घाईघाईत उतरली.

पक्याने ऑफीस मधे पोचल्यानंतर नेहमीप्रमाणे आपली बॅग उघडली, तर त्याला धक्काच
बसला, त्या बॅगेत चक्क रिव्हाल्वर(बंदुक) काडतुससाहित होते...म्हणजे त्या अनोळखी
व्यक्तीने त्याच्या बॅगेत टाकले होते...

पक्याने ताबडतोब विचार केला, आत्महत्येचा..मग विचार केला, आजपर्यंत कधीच कुणाच्या
उपयोगात आलो नाही.. तर सगळ्याचे भले करून मग जीव द्यावा...

तो ताबडतोब ऑफीसच्या खाली उतरला, कार न घेता तसाच गेट वरुन ऑटो रिक्षा साठी
आवाज दिला... ऑटो रिक्षावाला सुरुवातीला अंधेरीवरुन गोरेगाव ला येण्यास तयार होईना..
खूप विनविण्या केल्यानंतर मग पक्याने त्याला ५०० रुपये देतो म्हणाला तर तो
ताबडतोब तयार झाला. प्रवासात पक्याच्या लक्षात आले की त्याचा मीटर पण खूप
पळत होता.थोडक्यात तो अशाच रीतीने लोकांना लुटत होता... पक्याने त्याला ऑटो
आरे कॉलनी घ्यायला सांगितली, तेथे एका निर्जन ठिकाणी जाउन पक्याने त्याच्या
कानपटीत बंदुक ठेवून चाप ओढला. आणि एका कागदावर लिहिले...
तू जर लगेच हो म्हणाला असतास तर ठीक होते, तुला जगण्याचा काहीच अधिकार नाही..

क्रमश...........

मला एड्स झालाय... (भाग २)

मला एड्स.. झालाय.   30/10/2011.. ................................. (भाग २)

आरे कॉलोनीतून मेन रस्त्यावर येऊन तिथून ऑफीस साठी बस पकडली,
ऑफीसला आपल्या केबिनमधे पोचल्यावर घामाघूम पक्याच्या मनावर एक
समाधान दिसत होते...

गाडी सर्वीसिंग साठी देऊन संध्याकाळी पक्या समुद्रकिनारी गेला, तर तेथे एक
व्यक्ती त्याला खुणावत होती, साहेब, तुम्हाला पाहिजे तसा माल माझ्याकडे आहे,
आणि त्याने पक्याला आल्बम दाखवायला सुरूवात केली, पक्या काही बोलन्याआधीच
त्याने पक्याला हॉटेलचा पत्ता,चावी,रूम नंबर त्याच्या हातावर टेकवत मोबाईल वर
कोणाशी तरी बोलून रात्री १० ची वेळ ठरवीली. आणि पक्याकडे ५००० रुपये अड्वान्स
मागितला,त्या गार गार वार्‍यात एव्हाना पक्याचे डोके तापत गेले. त्याने त्या व्यक्तीला
रुपये द्यायचे म्हणून एका आडोशाला नेले, आणि तेथेच बंदुकीचा चाप ओढला..
त्याच्या खिशात कागद टाकला त्यावर लिहिले होते...

"तू जर अशी भडवेगिरी केली नसतीस तर कदाचित तू आज जिवंत असतास"

पक्या तिथून तडक घरी निघाला तर त्याच्या लक्षात आले की त्या व्यक्तीने
त्याला हॉटेलची रूम ची चावी दिली आहे, मग पक्या त्या हॉटेलवर पोहोचला.
रूम मधे एक साधारण जस्ट २१ वर्षाची मुलगी अगोदरच तेथे बसलेली..ती
त्याच्याकडे सुंदर स्मितहास्य करत त्याला बिलगली आणि जोरात ओरडली...

पक्याने अगोदरच बंदुकीचा चाप ओढला होता.....

तेथेही त्याने ग्लासवर मेसेज लिहिला...
"आज तुझ्यासारख्या कॉल गर्ल्स मुळेच बहुतेक लोक बरबाद झाले आहेत..
तुला जगण्याचा काहीही हक्क नाही."

तिथून घरी गेल्यावर पक्याने लिस्ट बनवायला घेतली...
कोणा कोणाला संपवायचे आहे आणि शांत झोपून घेतले..

दुसर्‍या दिवशी वर्तमान पत्रात तसेच टी व्ही वरील न्यूज़ मधे ट्रिपल
मर्डर ची बातमी वाचली, पण पोलिसांना अजुन काही क्लू मिळाला
नसल्याचे समजले....

पक्याच्या चेहर्‍यावर खूप मानसिक समाधान दिसत होते..

पक्याने आपली सर्वीसिंगला दिलेली गाडी घेऊन ऑफीसला पोचला,
तेथे त्याच्या नावाने एक अगोदरच कुरियर आले होते,
त्यातील मजकूर वाचून पक्या उडालाच

श्री प्रकाश,

आम्ही क्षमस्व आहोत, काल जो तुम्हाला रिपोर्ट पाठविला होता,
तो तुमचा नसून दुसर्‍याच व्यक्तीचा आहे, त्यावर चुकुन तुमचे
नाव टाइप झाले आहे...

तुमचा खरा रिपोर्ट सोबत जोडत आहे.....
(तुमचा रिपोर्ट HIV- Negative आहे)

म्हणजे मला एड्स झालाच नाही,पक्याच्या डोक्याचा भुगा झाला,
HIV- Positive असल्यामुळेच त्याने हे खून केले होते....
जर डॉक्टर ने आपले काम चोख बजावले असते तर
कदाचित ते तिघेही वाचले असते...

आणि आपोआपच पक्याची पावले डॉक्टरच्या क्लिनिक च्या दिशेने वळाली..

..

समाप्त..

ही स्टोरी वाचल्यावर आपली मते जरूर द्यावी..

पेन

आज सकाळची बँकेतील गोष्ठ

सकाळी एका बँकेत कॅश डीपोजीट करण्यासाठी , स्लीप
भरण्यासाठी पेन न्हवता, म्हणून काउनटर असलेल्या इसमाकडे मागितला
तर तो म्हणाला " तिकडे स्लीप च्या काउनटर आहे तिथून घे "

त्या काउनटर अगोदरच गर्दी होती, कारण बँकेने जो पेन ठेवला होता
तो एका सुतळीने बांधलेला होता..

मला मात्र मनातल्या मनात हसायला आले कि
" मी एवढ्या विश्वासाने बँकेत माझे पैसे जमा करतो आणि
बँक मात्र ५ रुपयाच्या पेनासाठी त्यांच्या कस्टमरवर अजिबात
विश्वास ठेवत नाही"

डॉलर


रुपया म्हणाला डॉलरला ..........
या जन्मात तरी आपले मिलन अशक्य आहे..
 
 
डॉलर म्हणाला रुपयाला
मला वाटले नव्हते तू माझ्या प्रेमात एवढा पण घसरशील ....

Thursday 17 May 2012

चालू पक्या

चालू पक्या

लग्नानंतर पक्याच्या बायकोने विचारले
तुम्हाला पूर्वी किती मैत्रिणी होत्या (Girlfriends)

पक्याने तिच्या पुढे शेंगदाण्याचा डबा ठेवला
त्यात काही शेंगदाणे आणि ६० रुपये होते

"जेव्हा जेव्हा मला नवीन मैत्रीण मिळत गेली,
तेव्हा तेव्हा एक शेंगदाणा मी या डब्यात टाकत गेलो."

त्याच्या बायकोने सर्व शेंगदाणे मोजले तर किमान ११ निघाले

"म्हणजे तुम्हाला एकून ११ मैत्रिणी होत्या आणि या ६० रुपायचे काय ?

पक्या : " मी परवाच त्यातील १ किलो शेंगदाणे विकले, त्याचेच ६० रुपये आले .

मी तिची वाट पाहत होतो

मी तिची वाट पाहत उभा होतो,

तिला जवळपास्स 1/2 तास उशीर झला होता,
दुरुनच ती दिसली, मनाला जरा हायसे वाटले,
आज ती मस्त मस्त रेड ड्रेस मधे होती,
पाउस पडत होता, अंग अंग भिजले होते,
ती जशी जशी जवळ येत होती,
तशी काळजाची कालवा कालव् होत होती,
मी थोडा पुढे झालो
तर ती ना थांबताच माझ्या समोरून निघून गेली..
मी आवाज दिला.....

तर आतून कंडक्टर जोरा जोरात ओरडत होता,
पाठी मागून रिकामी बस येत आहे..

जस्ट इमॅजिन...

जस्ट इमॅजिन...
आपल्या शरीरातील सर्व अवयव एकमेकांशी बोलू लागले तर...
तर ते काय बोलतील.....

तर एकदा एक ईसम रात्री झोपल्या नंतर ....
मन : झोपला एकदचा दिवस भर नुसते हैराण केले या माणसाने

डोळे : नाहीतर काय, आज तर याने मला नको नको ते पाहायला लावले

हात : काय रे आज नक्की केले तरी काय

डोळे : अरे याची नजर खुपच वाइ ट आहे, घरी बायको असताना देखील, हा
आपला ऑफीस मधे स्टेनो वर ला इन मारतो.. तिला नुसता खालून वरुन
न्याहळात असतो, ती आली की हा लगेच मझा डावा डोळा मिचकावतो.
असा राग येतो ना.. आज तर त्याने काहारच केली, नको नको ते अश्लील मूवी
ऑफीस मधे पाहत राहिला....मला तर मझीच लाज वाटली...

कान : आणि मला हे सगळे ऐकायला लागले, मी आयुष्यात कधी, असे ऐकले न्हवते
ते आज ऐकले, नुसता कानात काड्या घालत असतो... कानात एवढा म ळ, झा ला
तो धड काढतही नाही...

पाय : अरे काय तुमची बडबड चालू आहे, जरा कुठे आराम कर त होतो....

डोळे : नमस्कार, राव, आजकाल तुमचे जास्त दर्शन होत नाही.. आणि कसे होणार..
तुमच्याकडे पाहायला गेलो की हे नउ महिन्याचे गरोदर असल्यासारखे हे पोट
पुढे दिसते... त्यामुळे कधी चाललत तर च तुमचे दर्शन होते.. तुमचे आपले
बर चालल दिसताय...

पाय: कसल डोंबलाचे चांगले चालल य, हा माणूस एवढ खा खा खातो, एवढ वजन
वाढवून ठेवले आहे की चालताना जीव नकोसा होतो, गूडघे एवढे दुखतात म्हणून
सांगू ,क धी एकदा आडवा पडतो असे वाटते....

पोट: मगास्पासून ऐकतोय, त्याला मी काय करणार...या जिभेचे चोचले खूप आजकाल वाढले आहेत, जरा काय खायचे दिसले तर लगेच सुरूवात.. आपल्या पोटा ला किती लागते,
याचा जरा सुधा विचार करत नाही, नुसतेच हवर्‍या सारखे तुटून पडतात... आज तर
याने श्रावणात चिकेन खाल्ले, मझा धर्मच भ्रष्ट केला... एवढे तिखट खाल्ले की...
पोटाची नुसती आग आग होतेय.. पोट ही एवढे पसरत चालले आहे की, पॅंट ची बटने सुधा
लागत नाही...

जीभ : हे बघा यात मझा काही दोष नाही. याचे मन च टाळ्या वर नाही. नुसतेच चंचल आहे.

मन : हे पहा, मी आपल्या मेंदूचे आ देश पा ळतो...

हात : मझयाबाबतीत सांगतो, दिवसभर हा कंप्यूटर वर फेस बुक वरील धमालवाडीतल्या
मित्रांबरोबर टाइम पास कर त बसतो, एवढी बोटे दुखतत म्हणून सांगू, जेवतांना हात सुधा
तोंड पर्यंत पोहोचताना खूप त्रास होतो.. कधी कधी तर कुठल्या हाताने कुठले काम करायचे हे सुधा त्याला क ळ त नाही...उजवा आणि डावा सुधा क ळ त नाही.. आज तर त्याने डाव्या हाताची बोटे सुजवुन ठेवली आहेत..आता त्याला हे माहीत नाही का, आपला डावा हात किती महत्वाचा आहे ते... सकाळचे वांदे होणार..

दात:  आज तर याने चिकन खाताना मला एवढे हैराण केले की... माजे दोन भा उ दुखायला लागले. आम्ही ३२ पैकी फक्ता २८ च उरलोय, असेच चालत राहीले तर..आमच्या सर्वांचे राम नाम सत्य होण्यास वेळ लागणार नाही..

हृदय : मी तुमच्या सर्वांच्या भावना समजू शकतो, पण मला कोण समजून घेणार...माझ्याकडे
फक्ता एकाच खास व्यक्तीला ठेवायची जागा असते.. पण या ईसामने एवढे कप्पे केलेत की काय विचारू नका. तुम्हा सर्वांना किमान दिवसभरात थोडा तरी आराम करावयास मिळतो.
माझ्या  नशिबात तर ते पण नाही...याचा जन्माहोयच्या आधीपासून मी धडधडतोय ....
 पण शरीराचा भार आता पेलवत नाही.कधी मी बंद पडेन हे सांगता येत नाही

पक्या

बंड्या, पक्या आणि गण्याचा एका कार अपघातात मृत्यू होतो.
ते तिघेही वर पोचल्यावर चित्रगुप्त त्यांना विचारतो..
तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून काय अपेक्षा आहेत,
तुम्हाला काय पाहायला आवडेल..

गण्या : माझे कुटुंबीय खूप रडतील आणि म्हणतील, मी खूप चांगला प्रेमळ माणूस होतो
आणि उत्तम डॉक्टर होतो.

बंड्या : मला असे पाहायचे आहे कि, मी एक उत्तम नवरा आणि चांगला शिक्षक जो आजकालच्या मुलांचे उत्तम भविष्य घडवायचा .

पक्या : मला असे पाहायचे आहे कि लोक म्हणतील, अरे बघ बघ हलायला लागला, जिवंत आहे वाटते ..

खडूस बॉस

एका कंपनीचा बॉस खूपच खडूस होता, कोणीही थोडा जरी
कामचुकारपणा केला तर तो त्यास कामावरून काढून टाकत असे

एकदा दुपारी बंड्या कंपनीत विनाकारण इकडे तिकडे मधेच उभा होता,
त्याला पाहून त्या बॉसचे डोके फणफणले

तो बंड्याला म्हणाला " तुझा पगार किती ?"

बंड्या : ५००० रुपये

बॉस : (भडकून) हे घे १५००० रुपये, तीन महिन्याचा पगार
उद्यापासून कामावर येवू नकोस, तुझासारखा कामचुकार
माणूस मला कंपनीत नकोय.

बंड्याने अजिबात गयावया न करता रुपये घेऊन निघून गेला

बॉस (सेक्रेटरीला ) : हा माणूस कुठल्या विभागात काम करीत होता.

सेक्रेटरी : तो कुरियर बॉय होता...

आता तुम्हीच विचार करा बॉस चे काय झाले असेल

वापर

जेव्हा एखादी मुलगी प्रेमात पडते...
तेव्हा ती हृदय वापरते.

पण जेव्हा लग्न करायची वेळ येते, तेव्हा मात्र
मेंदूचा वापर करते

एक सत्य

एक सत्य ....

बहुतेक मुलांच्या आईला आपल्या मुलाने
श्रावणबाळ सारखे असावे, असे वाटत असते....

पण तिला
आपल्या नवऱ्याने कधीच श्रावणबाळ होऊ नये,
असे देखील वाटत असते.........

जीवनाची राख

एके दिवशी काय झाले ........

जमिनीवर पडलेल्या सिगारेट ची राख सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला म्हणाली...

तुझ्यामुळे माझ्या जीवनाची राख झाली....

..
तुझ्यामुळे माझ्या जीवनाची राख झाली ...

एक दिवस असा येईल
कि माझ्यामुळे तुझ्या जीवनाची राख होईल.

ज्ञान विज्ञान

विज्ञान म्हणते

" जिभेला लागलेली जखम शरीरातील इतर जखमांपेक्षा लवकर बरी होते "

ज्ञान म्हणते

" जीभेमुळे झालेली जखम मात्र कधीच बरी होत नाही "

बोलणारा पोपट

बोलणारा पोपट

एकदा एक बाई एका पोपट विक्रेत्या कडून ३००० रुपये
देऊन एक सुंदर बोलणारा पोपट विकत घेते.

दुकानदाराने तिला कल्पना दिली कि हा पोपट पूर्वी
... रेड लाईट भागातील एका बाईकडे होता.
तरीपण तो दिसायला सुंदर असल्याने तिने तो विकत घेतला

घरी आल्यावर पोपट म्हणतो.. "वा नवीन घर, नवीन बाईसाहेब "
काही वेळाने तिच्या तिन्ही मुली कॉलेज वरून येतात
तेव्हा पोपट म्हणतो.."वा नवीन घर, नवीन बाईसाहेब, नवीन मुली"
आता जरा त्या बाईला थोडेसे टेन्शन येतं.

संध्याकाळी त्या बाईचा नवरा प्रकाश घरी येतो..
तेव्हा पोपट म्हणतो.." हाय पक्या, इकडे पण "

पाळलेले मांजर

एकदा संता त्याच्या पाळलेल्या मांजरला कंटाळला.

तो तिला घेऊन बाजूच्या गल्लीत गेला आणि तिला तिथेच सोडून आला
घरी येऊन बघतो तर काय "मांजर त्याच्या आधीच घरी परतलेली "

मग दुसऱ्या दिवशी तो पुन्हा तिला घेऊन रोड क्रॉस करून जरा दूरच्या
वस्तीत सोडून घरी परत आला , तर मांजर त्याच्या आधीच घरी परत आलेली.

मग तिसऱ्या दिवशी खूपच वैतागून तो पुन्हा तिला घेऊन खूप खूप लांब गेला आणि
तिला सोडून दिले , थोड्यावेळाने ...त्याने बायकोला फोन केला कि
" मांजर घरी परत आली का ?"

बायको म्हणाली "ती तर केव्हाच परत आली"

संता त्याच्या बायकोला रडत म्हणाला "सालीला सांग, मी तिला जेथे सोडले होते,

 तिथे परत ये, आणि मला घेऊन जा ,मी रस्ता चुकलोय, घर सापडत नाहीये .

फक्त २ वस्तू

या जगात आपल्याला प्रेमात पडायला कुठल्याच वस्तू अडवू शकत
नाही..फक्त खालील २ वस्तू सोडून
..
..
..
..
..
..
..
..
... आईची चप्पल आणि बाबांचा बेल्ट

एक लांब श्वास

त्याने तिला हाताशी धरून ओठावर टेकविले
एक लांब श्वास घेऊन...
..
..
..
..
..
..

पायाखाली तुडविले
... ..
..
..
..
cigaret smoking is injurius to health

आय लव यु

एकदा बंड्याने शाळेमध्ये एका मुलीला
" आय लव यु " म्हटले

त्या मुलीले बंड्याच्या मुस्कटात लावून दिली आणि म्हणाली
" काय म्हनालास बंड्या "

बंड्या : अग भवाने, जर तू ऐकलेस नव्हते तर मारलेस कशाला ?

तुमचे असे कधी झालंय काय ?

तुमचे असे कधी झालंय काय ?
..
..
आपल्याला स्वताचाच खूप राग येतो...

जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल चार्जिंग साठी ठेवता
आणि १ तासाने येऊन जेव्हा पाहता ,
अरे स्वीच बोर्ड चे बटन तर तुम्ही चालूच केले नाही.

बंड्या( टीसी....)

बंड्या( टीसी....)

एकदा एका युवकाने ट्रेन मध्ये बंड्याला, सकाळी ४ वाजता पुणे स्टेशन आले कि
उठवायला सांगितले.. झोप उडाली नाही तर अगदी जबरदस्ती स्टेशन च्या बाहेर सोडून द्यायला सांगितले कारण त्या युवकाचा पुण्यामध्ये अति महत्वाचा इंटरव्यू होता..

सकाळचे ८ वाजले , तो युवक उठला तर पुणे स्टेशन तर कधीच निघून गेले होते, त्याने बंड्याला धरला,नको नको त्या घाणेरड्या प्रेमळ शिव्या दिल्या...

इतर प्रवाशी बं.ड्या कडे बघतच राहिले ... हा एवढा वेळ गप्प का ?

बंड्या( टीसी....विचार करीत होता ) : च्यामारी, मग मी सकाळी ज्याला जबरदस्ती ट्रेन च्या बाहेर हाकलले ,तो मला आता किती शिव्या देत असेल ?


बंड्याचा अविष्कार


बंड्याचा  अविष्कार
बंड्या : गुरुजी मी खूप मोठा अविष्कार केला आहे,
तुम्ही भिंतीच्या पलीकडचे सर्व काही पाहू शकता..
तुमच्या त्या मेडम ला पण पाहू शकता..
.
.
.
.
गुरुजी ( खुश होऊन) : काय सांगतोस बंड्या.....खूप छान ....कसे काय दिसते भिंतीच्या
पलीकडचे, काय केलेस तू त्यासाठी,
.
.
.
.
.
बंड्या : होल

Monday 14 May 2012

बंड्या शाळेत असताना


बंड्या शाळेत असताना ....

एकदा खुप हसत होता...

ते पाहून एक मुलगी उठली आणि म्हणाली...

"कायला दात काढून हसत राहिलाय बे"

बंड्या : तू कोण हायीस ग ?

मुलगी : म्या मोनीटर हाय

बंड्या : आजकाल मोनीटर चा नाय तर एलसीडी चा जमाना हाय.

आई


आई

आई आई आई आई आई,
तुझ्यापुढे मी तर काहीच नाही

माझ्या फक्त चाहुलानेच तू करू लागलीस प्रेम
म्हणून असे म्हणतात का ग, आंधळे असते खरे प्रेम

तुझ्यामुळे पाहता आले हे सूर्य, चंद्र , तारे
तुझ्या प्रेमापुढे तसे फिके पडे सारे

नसताच दिला तू मला जन्म , केली असतीस माझी भ्रूणहत्या,
पाहू शकलो असतो का हि इंद्रधनुषी दुनिया मी आत्ता

ठेच लागता "आई ग" म्हणून प्रथम तुझे नाव येते वदनी,
तुझे नाव घेता मोठी मोठी हि संकटे जाती यमसदनी

खाऊचा तुझा वाटा पण माझ्यासाठी राखून ठेवलास,
तुला होणारा त्रास मात्र तू नेहमीच झाकून ठेवलास

जागलीस रात्र रात्र जेव्हा मी पडलो आजारी,
तहान भूक विसरुनी बसायची तू शेजारी

आई , आई , काय आणि कसे सांगू आई
तू नसतीस तर या जीवनाला अर्थ नाही

हुशार बंड्या