Monday 14 May 2012

आई


आई

आई आई आई आई आई,
तुझ्यापुढे मी तर काहीच नाही

माझ्या फक्त चाहुलानेच तू करू लागलीस प्रेम
म्हणून असे म्हणतात का ग, आंधळे असते खरे प्रेम

तुझ्यामुळे पाहता आले हे सूर्य, चंद्र , तारे
तुझ्या प्रेमापुढे तसे फिके पडे सारे

नसताच दिला तू मला जन्म , केली असतीस माझी भ्रूणहत्या,
पाहू शकलो असतो का हि इंद्रधनुषी दुनिया मी आत्ता

ठेच लागता "आई ग" म्हणून प्रथम तुझे नाव येते वदनी,
तुझे नाव घेता मोठी मोठी हि संकटे जाती यमसदनी

खाऊचा तुझा वाटा पण माझ्यासाठी राखून ठेवलास,
तुला होणारा त्रास मात्र तू नेहमीच झाकून ठेवलास

जागलीस रात्र रात्र जेव्हा मी पडलो आजारी,
तहान भूक विसरुनी बसायची तू शेजारी

आई , आई , काय आणि कसे सांगू आई
तू नसतीस तर या जीवनाला अर्थ नाही

हुशार बंड्या
 

No comments:

Post a Comment